Advertisement

बाप्पाच्या विसर्जनासाठी 23,500 पोलिसांची फौज तैनात

अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोच्या संख्येने मुंबईकर गर्दी करतात.

बाप्पाच्या विसर्जनासाठी 23,500 पोलिसांची फौज तैनात
SHARES

अनंत चतुर्दशीच्या (anant chaturdashi) दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोच्या संख्येने मुंबईकर गर्दी करतात. रस्त्यावर जमा होणारी गर्दी लक्षात घेता, सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी 23,490 पोलिसांची फौज तैनात केली आहे.

मुंबईतील (mumbai) गिरगाव चौपाटी (girgaon chowpaty), शिवाजी पार्क, जुहू चौपाटी आणि गणेश घाट पवई या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा मनोरे उभारण्यात आले आहेत. 

गणेश मुर्तींच्या (ganesh idol)विसर्जनाच्या वेळेस रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी वाहतुक पोलिसांनी वॉच टॉवर उभारले आहेत. तसेच वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी बॅरिकेडींगचे काम अंतिम टप्प्यात आहे.

विसर्जनाच्या वेळेस गाड्या बंद पडल्यास तात्काळ कारवाई करण्यास वाहतूक क्रेन्स तसेच बीएमसी (bmc) क्रेन्स तैनात करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी (mumbai police)  23,490 पोलिसांची फौज तैनात केली आहे. यामध्ये 2,900 पोलिस अधिकारी आणि 20,500 पोलिस कर्मचारी विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तासाठी असणार आहेत. 

वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, एनजीओ, सिव्हील डिफेन्स, अनिरुद्ध अकादमी, आरसीएप टीचर्स, एनएसएस आणि स्काऊट गाईडची मदत सुद्धा घेणार आहे. 



हेही वाचा

विकासासाठी मिठागरांचा ऱ्हास, मुंबईसाठी घातक

जागावाटपावरुन 'मविआ'मध्ये खलबते

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा