Advertisement

'AI Ghibli Art' वापरून बनवलेले बाप्पाचे फोटो हटवण्याची मागणी

बुधवारी मंडळाने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे फोटो हटवण्याची विनंती केली आहे.

'AI Ghibli Art' वापरून बनवलेले बाप्पाचे फोटो हटवण्याची मागणी
SHARES

मुंबईचा राजा मंडळाने सोशल मीडियावर 'AI Ghibli Art'चा वापर करून बनवलेल्या गणपतीच्या फोटोवरून नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी मंडळाने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे फोटो हटवण्याची विनंती केली आहे. 

व्हॉट्सॲपच्या स्टोरीपासून ते इंस्टाग्राम पोस्ट असा सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या या ट्रेंडने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. ही चित्रे म्हणजे गणेशाचा अपमान असल्याचे मत मंडळाने व्यक्त केले.

"आपल्या सर्वांना माहीत आहे की, मुंबईतील राजा आणि इतर देवतांच्या मूर्ती आमच्या भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. देवतांच्या प्रतिमा पावित्र्य राखतात. सध्या सोशल मीडियावर काही लोक बाप्पाच्या फोटोंवरून 'AI Ghibli Art' तयार करत आहेत, जे अयोग्य आहे," असे मुंबई चा राजा मंडळाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्याऐवजी, आम्ही आपणा सर्वांना आवाहन करतो की, आपण आपल्या कलागुणांचा वापर करून AI अॅपचा वापर न करता आपल्या हातांनी किंवा डिजिटल सॉफ्टवेअरच्या मदतीने बाप्पाची सुंदर चित्रे साकारून आपल्या कलेतून बाप्पावरील आपली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करावे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. 

 


हेही वाचा

मुंबई महापालिकेकडून 'इतकी' थकबाकी वसूल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा