Advertisement

NITI आयोगानुसार मुंबईत 2030 पर्यंत होणार दुप्पट आर्थिक वाढ

या क्षेत्राला आर्थिक सेवा, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य आणि मीडिया यांसारख्या उद्योगांसाठी जागतिक सेवा केंद्र म्हणून स्थापित करण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे.

NITI आयोगानुसार मुंबईत 2030 पर्यंत होणार दुप्पट आर्थिक वाढ
SHARES

महाराष्ट्राचे (maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गुरुवारी NITI आयोगाचा अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील आर्थिक वाढ सध्याच्या 140 अब्ज डॉलर्सवरून 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.

शिवसेना (उबाठा) विरोधी पक्षनेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी मात्र, महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी सेंट्रल थिंक टँकने केलेला अभ्यास हा शहराला केंद्रशासित प्रदेशात रुपांतरित करण्याचा मानस आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांच्या उपस्थितीत 'सह्याद्री' या राज्य अतिथीगृहात अहवाल प्रसिद्ध झाला.

अहवालात पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत मुंबई विभागातील आर्थिक घडामोडींमध्ये लक्षणीय वाढ करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यात 28 लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचेही म्हटले आहे.

या क्षेत्राला आर्थिक सेवा, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य आणि मीडिया यांसारख्या उद्योगांसाठी जागतिक सेवा केंद्र म्हणून स्थापित करण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे.

आर्थिक वाढ दुप्पट झाल्यामुळे दरडोई उत्पन्न सध्याच्या 5,248 डॉलरवरून 2030 पर्यंत 12,000 डॉलरपर्यंत वाढेल.

पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी दावा केला की केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार मुंबईला (mumbai) केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा विचार करत आहे आणि म्हणूनच हा अभ्यास केला जात आहे.

“मुंबईला गिफ्ट सिटी (gift city) असायला हवी, ही आमची मागणी आहे जी चोरी करून गुजरातला नेली. केंद्रात आमचे सरकार असेल तेव्हा मुंबईचे स्वतःचे गिफ्ट सिटी असेल,” असे माजी राज्यमंत्री म्हणाले.

अहमदाबादजवळील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) ला “प्रचार” केल्याबद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि मुंबई उत्तरचे खासदार पीयूष गोयल यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना (उबाठा) (shivsena ubt)आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) या प्रादेशिक पक्षांनी यापूर्वी केंद्र सरकारवर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या योजना आखल्याचा आरोप केला आहे.



हेही वाचा

17-18 सप्टेंबरला 8 अतिरिक्त लोकल ट्रेन्स धावणार

नवी मुंबई : अटल सेतूवरून NMMTच्या 2 बस सेवा सुरू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा