पालिकेने मुंबईतील विहिरी आणि बोअरवेल तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्याच्या विरोधात टँकर मालकांच्या संघटनेने गुरुवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील अनेक सोसायट्या आणि विकासकामे यांना पाणी टंचाईचा फटका बसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीनंतर पालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली. पण तरीही टँकर चालक संप मागे घेत नाही आहेत.
संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेऊन मुंबई महापालिका खासगी गृहनिर्माण संस्था (सोसायटी) यांच्यासह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. त्याकरीता मुंबई महापालिकेने सुरळीतपणे करण्यासाठी महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती देखील निश्चित केली आहे.
हेही वाचा