मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये कोरोना वॉर रुम सुरू करण्यात आली आहे. सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांच्याकडे या कोरोना वॉर रुमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अश्विनी भिडे ह्या नुकत्याच महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर रुजू झाल्या आहेत. कोरोना वॉर रुमच्या माध्यमातून आवश्यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस ही वाॅर रूम सुरू राहणार आहे. अश्विनी भिडे या वॉर रुमच्या प्रमुख समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. वॉर रुमच्या माध्यमातून कोरोनाविषयक सांख्यिकीय माहिती एकत्र करून त्या माहितीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. या माहितीच्या आणि विश्लेषणाच्या आधारे प्रतिबंधात्मक कार्यवाहीची व नियोजनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. यानुसार विभागस्तरीय नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्याने करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर महानगरपालिकेत पाठविले आहे. यामध्ये 1995 च्या तुकडीतील श्रीमती अश्विनी भिडे आणि 2004 च्या तुकडीतील डॉक्टर रामस्वामी एन. या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा -
‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाऊनमुळं टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ