Advertisement

फुकट्या प्रवाशांवर बेस्टची कारवाई

सध्या दररोज 35 लाखांहून अधिक प्रवासी 'बेस्ट' मधून प्रवास करतात. या प्रवासात अनेकदा विनातिकीट प्रवास करणारे प्रवासीही असतात.

फुकट्या प्रवाशांवर बेस्टची कारवाई
SHARES

तिकीट तपासण्यासाठी कमी मनुष्यबळ, विनावाहक बस नियोजनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे बेस्ट बसमधील विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे 'बेस्ट'च्या (best) महसुलावरही परिणाम होत आहे.

सन 2023 आणि 2024 आणि जानेवारी 2025 या कालावधीत एकूण 2 लाख 84 हजार 247 विनातिकीट प्रवासी आढळले आहेत. या प्रवाशांकडून 'बेस्ट'ने पावणेदोन कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आणि मुंबईतील (mumbai) विविध सेवा पूर्वपदावर आल्याने बेस्ट गाड्यांनाही गर्दी वाढू लागली आहे. सध्या दररोज 35 लाखांहून अधिक प्रवासी 'बेस्ट' मधून प्रवास करतात. या प्रवासात अनेकदा विनातिकीट प्रवास करणारे प्रवासीही असतात.

विनातिकीट प्रवास (without ticket) करणारे प्रवासी अनेकदा सराईतपणे हात दाखवून 'पास', असे म्हणत निसटण्याचा प्रयत्न करतात. तर, गर्दी असलेल्या बसमध्ये चढलेले अनेक प्रवासी दरवाजाजवळ उभे राहून तिकीट काढल्याशिवायच आपल्या थांब्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात.

या सर्वच प्रवाशांना (passangers) पकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न तिकीट तपासनीसांच्या माध्यमातून 'बेस्ट' करत असते. मात्र प्रत्येक वेळीच ते शक्य होत नाही. वर्ष 2023 आणि 2024 तर जानेवारी 2025 मध्ये एकूण दोन लाख 84 हजार 247 विनातिकीट प्रवासी आढळले.

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 मध्ये 1 लाख 6 हजार 136 विनातिकीट प्रवासी आढळले. सन 2024 मध्ये यात मोठी वाढ झाली आणि 1 लाख 67 हजार 110 प्रवासी आढळले आहेत. जानेवारी 2025 या नव्या वर्षातही विनातिकीट प्रवासी कमी झालेले नाहीत. जानेवारीत 11 हजार 2 प्रवासी आढळल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

विनावाहक बससेवेचा प्रवाशांकडून गैरफायदा बेस्टने ऑक्टोबर 2019 मध्ये विनावाहक बससेवा सुरू केल्या. या बसमध्ये वाहक नसतो. बस थांब्यावरच उभ्या असलेल्या वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मधल्या थांब्यावर गर्दीच्या वेळी काही प्रवासी बसमध्ये प्रवेश करतात व सर्रास विनातिकीट प्रवास करतात.

तर, काही वेळा बस थांब्यावरच तिकीट देण्यासाठी वाहक नसल्याने शेवटचा थांबा येईपर्यंत प्रवाशाला तिकीट मिळत नाही. विनातिकीट प्रवाशांमुळे बेस्टच्या महसुलावर परिणाम होत आहे. सन 2023 पासून ते जानेवारी 2025 पर्यंत 1 कोटी 74 लाख 16 हजार 116 रुपये दंड (fine) वसूल करण्यात आला आहे.

वर्ष दंडवसुली
2023 --- 65 लाख 76 हजार 304 
2024 --- 1 कोटी 1 लाख 73 हजार 916 
जानेवारी 2025 --- 6 लाख 65 हजार 896 रुपये



हेही वाचा

सिडकोच्या महाग घरांमुळे अर्जदारांची माघार

मिठी नदी स्वच्छतेतील घोटाळा; तीन कंत्राटदारांची चौकशी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा