Advertisement

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून मास्कविना फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल
SHARES

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून मास्कविना फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र बेफिकीर मुंबईकरांना वेसण घालण्यात यंत्रणांना अपयश आले आहे. मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत ५४ कोटी १३ लाख ५९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक आहे. मात्र काही मुंबईकर मास्कविनाच सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळले होते. त्यामुळे अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेने पथके सज्ज केली. मास्कविना फिरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. मुंबईत मुखपट्टीविना फिरणाऱ्या २६ लाख ८७ हजार ३३९ नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

या नागरिकांकडून ५४ कोटी १३ लाख ५९ हजार रुपये दंडरूपात वसूल करून पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. मास्कविना फिरणाऱ्यांविरुद्ध पालिका, पोलीस आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या कारवाईच्या आकडेवारीवरून अधेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक मास्कविना फिरत असल्याचं आढळलं आहे. या परिसरात १ लाख ८५ हजार नागरिकांकडून ३ कोटी ७७ लाख रुपये दंड वसूल  केला आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ३ लाख १३ हजार २८९ नागरिकांकडून ६ कोटी २६ लाख ५७ हजार ८०० रुपये, तर मध्य व पश्चिम रेल्वेनं २३ हजार ८७१ जणांकडून ५० लाख ३९ हजार २०० रुपये वसूल केले.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा