Advertisement

महिला बचत गटांना महापालिका देणार २५ हजार रुपये


महिला बचत गटांना महापालिका देणार २५ हजार रुपये
SHARES

मुंबईतील महिला बचत गटांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आता महापालिकेडून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी प्रति महिला २ हजार रुपये याप्रमाणे महिला बचत गटांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे धोरण बनवण्यात आले आहे. हे धोरण स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आले आहे. महिला बचत गटांसाठी ही मदत मोलाची ठरणार आहे.


१ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना लाभ

मुंबई महापालिकेच्या सन २०१७-१८च्या आर्थिक वर्षात जेंडर बजेटअंतर्गत महिला बचत गटांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दिनदयाळ योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान योजनेच्या सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महापालिका हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमाचा खर्च महापालिकेच्या निधीतून करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत वार्षिक १ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ मिळेल. 


बचट गटांच्या सभासदांना २ हजार रुपये

या उपक्रमांतर्गत ५ ते २० महिलांचा बचत गट स्थापन करण्यात येईल. या बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत तथा सारस्वत बँकेत बचत खाते उघडल्यानंतर ३  महिन्यांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तसेच आर्थिक व्यवहाराच्या बाबींची पडताळणी व मूल्यमापन  केल्यानंतर हा निधी त्यांना दिला जाईल. महिला बचत गटास प्रति सभासद २ हजार रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त २५ हजार रुपये खेळते भांडवल वर्षातून एकदाच दिले जाईल, असे नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे. बचत गटातील प्रत्येक सदस्याचे उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


आयकराचा शिक्का असला तरी लाभ

पिवळ्या व केशरी शिधापत्रिकांवर ‘आयकर पात्र’ असा शिक्का असल्यास महिलांचे अर्ज महापलिका रद्द करते. याबाबत भाजपाच्या नगरसेविका रिटा मकवाना यांनी मे महिन्यात महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महिला व बाल कल्याण योजनांसाठी पिवळ्या व केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये व आयकर पात्र शिक्का असलेल्या शिधापत्रिकाधारकांनासुद्धा योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवण्यास अतिरिक्त आयुक्त (शहर) यांनी मान्यता दिल्याचे नियोजन विभागाचे सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले आहे.



हेही वाचा -

आता 'बचत गटां'नी बनवलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी नाही!

'अक्षयपात्रा'साठी महिला बचतगटांच्या पोटावर लाथ?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा