Advertisement

'सेव्हन हिल्स'ला टाळे, ९ कोटींचा मालमत्ता कर भरलाच नाही!


'सेव्हन हिल्स'ला टाळे, ९ कोटींचा मालमत्ता कर भरलाच नाही!
SHARES

मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने थकीत मालमत्ता कर न भरल्याने गुरुवारी या रुग्णालयाचे प्रशासकीय कार्यालय महापालिकेने सील केले. महापालिकेने थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाला २८ फेबुवारीपर्यंतची मुदत दिली होती. परंतु, या मुदतीत कराची रक्कम न भरल्याने सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून त्यांचे प्रशासकीय कार्यालय सील करण्यात आले.


कोट्यवधींची रक्कम थकीत

महापालिकेच्या रुग्णालयाची जागा सेव्हन हिल्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी सेव्हन हिल्स रुग्णालय उभारण्यात आले. परंतु, या रुग्णालयाची मागील अनेक वर्षांपासूनची कोट्यवधी रुपयांची थकीत मालमत्ता कराची रक्कम थकीत आहे.


९ कोटींच्या वसुलीसाठी नोटीस

करनिर्धारण व संकलन विभागाचे सहायक आयुक्त क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्या परवानगीने सेव्हन हिल्सकडे थकीत असलेल्या ९ कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी नोटीस पाठवली होती. परंतु, त्यांनी ही रक्कम न भरल्याने ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.


एकूण ३९ कोटींची थकबाकी

सेव्हन हिल्स रुग्णालयाकडे एकूण ३९ कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकीत रक्कम आहे. त्यापैकी काही रकमेबाबत वाद असल्यामुळे त्याची सुनावणी सुरु आहे. परंतु ९ कोटी रुपयांच्या कराच्या रकमेबाबत कोणताही वाद नव्हता. ही रक्कम त्यांना भरावी लागणार होती आणि रुग्णालयालाही ही रक्कम भरणे मान्य होते. परंतु, वारंवार नोटीस पाठवूनही त्यांनी ही रक्कम भरली नाही.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा