Advertisement

जास्त बील आकारल्याने माहीममधील रुग्णालयाची नोंदणी रद्द

रुग्णालयामधील रुग्णांची ४८ तासांत अन्यत्र व्यवस्था करावी किंवा त्यांना घरी पाठवण्यात यावे तसंच कोणत्याही नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नये, असाही आदेश पालिकेने या रुग्णालयाला दिला आहे.

जास्त बील आकारल्याने माहीममधील रुग्णालयाची नोंदणी रद्द
SHARES

कोरोना रुग्णांकडून जास्त बील घेतल्यामुळे आणि एका ३४ वर्षीय रुग्णाच्या मृत्यू प्रकरणानंतर मुंबई महापालिकेने माहीममधील फॅमिली केअर रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द केली आहे. या रुग्णालयामधील रुग्णांची ४८ तासांत अन्यत्र व्यवस्था करावी किंवा त्यांना घरी पाठवण्यात यावे तसंच कोणत्याही नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नये, असाही आदेश पालिकेने या रुग्णालयाला दिला आहे. 

माहीममधील या रुग्णालयात आतापर्यंत एक लाखांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आलं आहेत. यामधील अनेक रुग्णांकडून सरकारने निर्धारित केलेल्या दरांपेक्षा अधिक पैसे घेण्यात आले. याबाबतच्या अनेक तक्रारी पालिकेच्या जी उत्तर विभागाकडं करण्यात आल्या होत्या. तसंच एका रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही त्याला कोरोनावरील उपचार देण्यात आल्याचं उघडकीस आलं.  रुग्णाला द्यायच्या औषधाच्या चिठ्ठीवरही वेगळ्याच व्यक्तीचे नाव असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. 

पालिकेच्या जी उत्तर विभागाने याची दखल घेऊन रुग्णालयाबाबत याबाबत विचारणाही केली. मात्र, रुग्णालयाकडून पालिकेला कसलीही माहिती देण्यात आली नाही. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आता या ३४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने आणि कारणे दाखवा नोटिसीला उत्तर न दिल्यामुळे रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्याचे आदेश पालिकेने दिले.


फॅमिली केअर रुग्णालय प्रशासनाने याबाबत म्हटलं की, कोरोनामुक्त रूग्णांकडून जास्त पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पैसे परत करण्यात आले. तसंच ज्या रुग्णाचा २५ जुलै रोजी मृत्यू झाला त्याचा कोरोनाचा चाचणी अहवाल जरी नकारात्मक होता. मात्र, तरीही त्याला कोरोनाची लक्षणे दिसत होती. पालिकेने रुग्णालय प्रशासनाची बाजू ऐकण्यासाठी संधी द्यावी.



हेही वाचा -

 सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा  मुंबईत कोरोनाचे

 ११०५ नवे रुग्ण, रविवारी ४९ जणांचा दिवसभरात मृत्यू 




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा