Advertisement

महापालिका मुंबईत बसवणार 'वॉटर एटीएम'

महापालिका रेल्वे स्थानकांवर लावणार वॉटर एटीएम मशीनला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद पाहता महापालिकेनंही वॉटर एटीएम सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका मुंबईत बसवणार 'वॉटर एटीएम'
SHARES

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची पाण्याची तहान भागावी यासाठी रेल्वे स्थानकांवर वॉटर एटीएम मशीन लावण्यात आल्या आहेत. स्थानकांतील या मशीनला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद पाहता महापालिकेनंही वॉटर एटीएम सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काळात मुंबईतील महत्वाच्या १०० ठिकाणी महापालिका वॉटर एटीएम मशीन लावण्याच्या विचारात आहे. या कामासाठी लवकरट निविदा काढण्यात येणार आहे.  

५-५ महत्वाच्या जागा

महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी वॉटर एटीएम मशीन लावण्यासाठी पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसर यांना वॉर्डमधील ५-५ महत्वाच्या जागा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. जुहू, मार्वे, अक्सा, गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांसह शॉपिंग मॉल, झोपडपट्टी नजीकचा परिसरांमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे. 

कंत्राटदाराची नियुक्ती

या सुविधेर्तंगत महापालिका रहिवाशांना केवळ १ ते २ रुपयांत ही सुविधा देणार आहेत. त्याशिवाय, प्लॅस्टिक ग्लासचा वापर न करता कागदाच्या ग्लासांचा वापर करण्यात येणार आहे. या सुविधेसाठी महापालिका कंत्राटदाराची नियुक्ती करणार आहे. तसंच, जमा झालेली रक्कमेचा एक हिस्सा पालिकेला मिळणार आहे.


Advertisement

हेही वाचा -

मुंबईसह उपनगरातील १० टक्के पाणीकपात रद्द करावी- योगेश सागर

आगीवर विझविण्यासाठी 'फायर रोबो' करणार अग्निशमन दलाच्या जवानांची मदत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा