Advertisement

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर खरेदीची सुवर्णसंधी

40 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, वाचा कधी सोडत निघणार

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर खरेदीची सुवर्णसंधी
SHARES

नवी मुंबईत आपलं हक्काचं आणि स्वप्नातलं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सिडकोकडून नवी मुंबईत घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत तब्बल 40 हजार घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वप्नातल्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

नवी मुंबई क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांकरिता अनेक गृहनिर्माण योजना राबविल्या आहेत. या सर्व गृहनिर्माण योजनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून या योजना कमालीच्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यानंतर आता नव्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्याचं सिडकोने ठरवलं आहे. जाणून घेऊयात या सोडतीच्या संदर्भातील सविस्तर माहिती...

कधी निघणार लॉटरी?

सिडकोकडून सर्वासमान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येते. या घरांची विक्री लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येत असते. आता सिडकोकडून 40 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही लॉटरी दसऱ्याच्या मुहूर्तावर काढण्यात येणार आहे.

कुठे असणार ही घरे?

मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोकडून काढण्यात येणाऱ्या लॉटरीतील ही घरे वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे या मोक्याच्या ठिकाणी स्वस्तात आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

सिडकोकडून नवी मुंबईतील विविध भागांत घरे बांधण्यात आली आहेत. तर अद्यापही अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू आहे. सिडकोकडून जवळपास 67 हजार घरांचे बांधकाम सुरू असून या घरांच्या विक्रीसाठी टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

नवी मुंबईत मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर आता नवी मुंबईतील विमानतळ सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील विमानतळ 2024 च्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी विमानतळावर विमानांची उड्डाण चाचणी सुद्धा करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी सुद्धा झाली आहे. त्यामुळे लवकरच विमानतळ सुद्धा सुरू होईल. याचा फायदा म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढणार असून आसपासच्या परिसराचा विकास सुद्धा झपाट्याने होणार आहे.



हेही वाचा

म्हाडाच्या घरांचे अर्ज करण्याची मुदत 12 तासांनी वाढवली

सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवायच्या आहेत : जितेंद्र आव्हाड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा