Advertisement

राज्यातील धरणांमधील पाण्याची पातळी घसरली

सध्या शिल्लक असलेला पाण्याचा साठा जुलैच्या मध्यापर्यंत टिकेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

राज्यातील धरणांमधील पाण्याची पातळी घसरली
SHARES

राज्यातील (maharashtra) धरणांमधील पाण्याची पातळी 41.30 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. पुणे (pune) विभागात सर्वात 36.31 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर अमरावती विभागात सर्वाधिक 50.09 टक्के पाणीसाठा (water storage) शिल्लक आहे.

सध्या शिल्लक असलेला पाण्याचा साठा जुलैच्या मध्यापर्यंत टिकेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जुलैपर्यंत संपूर्ण राज्यभर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिल्लक पाणीसाठा पुरेसा असल्याचे देखील म्हटले जात आहे.

मान्सून (monsoon) दाखल होण्यास विलंब झाला अथवा अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही तर पाण्याची भीषण समस्या निर्माण होईल.

महाराष्ट्रात 2,997 लहान, मध्यम आणि मोठी धरणे आहेत ज्यांची एकूण साठवण क्षमता 40,498 दशलक्ष घनमीटर आहे. एप्रिलच्या मध्यात या धरणांमध्ये एकूण 30,034 दशलक्ष घनमीटर किंवा क्षमतेच्या 41.30% पाणीसाठा होता.

गेल्या वर्षीच्या 35.16 टक्के पाणी साठ्यापेक्षा हा पाणीसाठा 6% जास्त असला तरी तापमानवाढीमुळे उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनापुढे प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. धरणांव्यतिरिक्त ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात पाण्याचे टँकर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पाणीपुरवठा विभागाच्या 7 एप्रिलच्या अहवालानुसार, सध्या राज्यातील 178 गावे आणि 606 वाड्यांमध्ये 223 टँकर पाणीपुरवठा करत आहेत. पुणे विभागात सातारा येथे 40 टँकर आणि मराठवाड्यातील जालना येथे 32 टँकर आहेत.

तसेच ठाणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 30 टँकर सुरू करण्यात आले आहेत.



हेही वाचा

ऐरोली : भारत बिजली जंक्शन अंडरपास 15-16 एप्रिलला बंद

मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत 100 टक्के पूर्ण होणार : नितीन गडकरी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा