कांदिवली - कांदिवली पूर्वेकडील दळवी महापालिका शाळेच्या दुरुस्तीचे काम अखेर मार्गी लागले आहे. स्थानिक नगरसेवक राम अशीश गुप्ता यांच्या प्रयत्नाने या शाळेच्या दुरुस्तीच्या काम करण्यात येत आहे.
गुरुवारी या शाळेच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी शाळेचे सहाय्यक अभियंता के. हेडवे, दुय्यम अभियंता, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग तसेच विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.