मुंबई (mumbai) पोलिस अधिकारी आणि सरकारी कर्मचारी ड्युटीवर (election duty) असल्याने त्यांना मतदान (vote) करणे शक्य होणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने (EC) पोलिसांना मतदान करता यावे यासाठी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
17 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील 10 मतदारसंघातील एकूण 6,567 पोलीस (mumbai police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान केले, असे मिडडेच्या वृत्तात म्हटले आहे.
कुलाबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले असून, येथे 1,879 पोलिस कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे. त्यानंतर वडाळा मतदारसंघात 1,407 पोलिस अधिकाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा आणि माहीम मतदारसंघात ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना पोस्टल मतदानासाठी शनिवार 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती.
धारावी मतदारसंघात 14 नोव्हेंबरलाच पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच शिवडी, वडाळा आणि वरळी मतदारसंघात 17 नोव्हेंबरपर्यंत पोस्टल मतदान सुरु होते.
राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची पोस्टल मते देणारे मतदारसंघ निहाय डेटा:
मलबार हिल -1,242
धारावी – 274
सायन कोळीवाडा - 324
वरळी - 42
भायखळा – 764
मुंबादेवी – 517
शिवडी (शिवडी) - 118
हेही वाचा