नवी मुंबई (navi mumbai) महापालिका क्षेत्रातील पालिकेच्या वाशी येथील अपंग प्रशिक्षण अर्थात ईटीसी केंद्राचा देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरीबाबत गौरव केला आहे.
वाशी येथील केंद्रातून आतापर्यंत हजारो अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे व या विशेष मुलांच्या आयुष्यात आनंद मिळवून देण्याचे काम पालिकेच्या ईटीसी केंद्रामार्फत करण्यात येते.
नवी मुंबई महानगरपालिकेने (nmmc) नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात शहरात आणखी एक ईटीसी केंद्र निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.
नवी मुंबई शहरात विद्यार्थ्यांसाठी 50 पेक्षा अधिक विविध माध्यमाच्या शाळा असून 2007 मध्ये रबाळे येथे तत्कालीन ईटीसी संचालक वर्षा भगत यांच्या प्रयत्नातून ईटीसी केंद्र सुरू केले होते. त्यानंतर हे केंद्र नेरुळ येथे सुरू करण्यात आले होते.
शहरातील अपंग विद्यार्थ्यांना (handicapped students) शिक्षण मिळण्यासाठी पालिकेचा हा उपक्रम सातत्याने वाढत गेला. त्यानंतर पालिकेने वाशी रेल्वेस्टेशनवळ अपंग विद्र्यार्थ्यांना सोयीसुविधा व शिक्षण देण्यासाठी भव्य केंद्र निर्माण केले या केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत विविध वस्तू तयार केल्या जातात.
तसेच त्यांना आवश्यक असलेलं ज्ञान देण्याचे काम पालिकेच्या वतीने केले जाते. पालिकेच्या याच कामाचा देशपातळीवर अनेकवेळा गौरव करण्यात आला आहे. वाशी येथील याच ईटीसी केंद्राच्या (ETC centre) विस्तारीकरणातून एक नवे केंद्र ऐरोली (airoli) येथे उभारण्यात येणार आहे.
सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच अपंग विद्यार्थ्यांनाही संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी पालिका सध्या सुरू असलेल्या ईटीसी केंद्रात अद्ययावत संगणक लॅब उभारणार आहे. जेणेकरुन या विशेष विद्यार्थ्यांना आयटी अभ्यासक्रम पूर्ण करता येईल त्यादृष्टीने पालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
हेही वाचा