Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू

मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे ३१३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३० हजार १२५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच १७८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १०६६ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत सोमवारी  दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- सुशांतची आत्महत्या होती की हत्या? : कंगना राणावत

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी मोठी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५८ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जून रोजी ६० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १४ जून रोजी एकूण ७९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, सोमवारी मुंबईत कोरोनाचे १०६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५९ हजार २०१ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  कोरोनाचे ३१३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३० हजार १२५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोनामुळे घेतला 'हा' निर्णय, चिंतामणीची १०० वर्षांची परंपरा खंडित

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ६९ हजार ९९४ नमुन्यांपैकी  १ लाख १० हजार  ७४४ नमुने पॉझिटिव्ह (१६.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८९ हजार  १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १४३ (मुंबई ६८, वसई-विरार २०,मीरा-भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२, पनवेल ७,  कल्याण-डोंबिवली ९, पालघर १, रायगड १), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), नाशिक-१६ (धुळे १३,जळगाव ३), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-२ (जालना २).

० १४ जून पर्यंत राज्यात २ लाख ६१ हजार २१० कोविड चाचण्या झालेल्या आहेत

० सक्रीय कंटेनमेंट झोन झोपडपट्टी आणि चाळी – ८२८

० सक्रीय सील बंद इमारती – ४८५९

० २४ तासांमधील संपर्काचा शोध अति जोखिम -  ७५६९

०सद्या CCC1 मधील अति जोखिम संपर्क - २०३८४

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा