महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ ने वाढली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ इतकी झाली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तर दुसरीकडे समाधान कारक बातमी म्हणजे ५ कोरोना बाधित रुग्ण पूर्णतहा बरे झाले असून त्यांना लवकरच डिसचार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचाः- दुकान उघडी ठेवल्यास होणार कारवाई - अनिल देशमुख
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. गुरूवारी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये ३ ने वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ४९ वरून ५२ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १०३६ जणांना विलगीकरण कक्षेत ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९७१ जणांच्या वैद्यकिय चाचणीत त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बहुतांश कोरोना बाधित रुग्ण हे परदेशातून भारतात परतलेले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी दोन नव्या लॅब सुरू केल्या आहेत. दिवसाला २४०० जणांची तपासणी केली जात आहे. आणखी ३ लॅब सुरू करणार आहोत.
हेही वाचाः- दुकान उघडी ठेवल्यास होणार कारवाई - अनिल देशमुखमात्र घाबरून जाण्याचे कारण नाही, ५ कोरोना बाधित रुग्ण पूर्णतहा बरे झाले असून लवकरच त्यांना डिसचार्ज देण्यात येणार आहे. मात्र, या पाचही जणांवर १४ दिवस लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. तसेच परिस्थिती नियंत्रणात असून केंद्र सरकारकडून ही मोठ्या प्रमाणात मदत पुरवली जात आहे. काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. विलगीकरण कक्षातून बाहेर पडलेल्या नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी जनतेच्या संपर्कात जाऊ नये, तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.