Advertisement

मेहबूब स्टुडिओतील क्वारंटाईन केंद्राला स्थानिक रहिवाशांचा विरोध

मेहबूब स्टुडिओत बनवण्यात येणाऱ्या या क्वारंटाईन केंद्राला स्थानिक रहिवाशांचा विरोध होत आहे.

मेहबूब स्टुडिओतील क्वारंटाईन केंद्राला स्थानिक रहिवाशांचा विरोध
SHARES

दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णांच्या विलगीकरण केंद्रात देखील वाढ करण्यात आली आहे. नुकतंच पालिकेनं वांद्र्यातला मेहबूब स्टुडिओ ताब्यात घेतला होता. या ठिकाणी क्वारंटाईन केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पण मेहबूब स्टुडिओत बनवण्यात येणाऱ्या या क्वारंटाईन केंद्राला स्थानिक रहिवाशांचा विरोध होत आहे. स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात एक निवेदन पत्र पालिकेला दिलं आहे.

पालिकेला दिलेल्या निवेदन पत्रात रहिवाशांनी म्हटलं आहे की, मेहबूब स्टुडिओ आणि इतर रहिवासी परिसरात कॉमन स्टॉर्मवेअर वॉटर ही यंत्रणा कॉमन आहे. त्यामुळे व्हायरस घरा-घरात पोडोचला तर? याची भिती आहे.     

मुंबईतील वाढते रुग्ण पाहता क्वारंटाईन करण्यासाठी मुंबईतील मोठमोठ्या जागा पालिका ताब्यात घेत आहे. काही दिवसांपूर्वी चर्चगेटचे वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्यात येणार होते. पण ही योजना रद्द करण्यात आली. कारण पावसाळ्यासाठी वानखेडे स्टेडिअम योग्य नाही. तिकडे पाणी भरण्याची शक्यता असते. त्यानंतर मेहबूब स्टुडिओत क्वारंटाईन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेबेलो रोआवरील सेंट सेबस्टियनच्या कॉलनीत राहणारे रहिवासी हबर्ट डी म्हणाले की, “हा सखल भाग आहे. मेहबूब स्टुडिओ निवासी क्षेत्राच्या अगदी मध्यभागी आहे. स्टुडिओच्या भिंती गृहनिर्माण सोसायटी आणि इतर निवासी भागांना जोडून आहेत. परिसरात बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत आणि मुलं राहतात ज्यांना विषाणूचा धोका निर्माण होऊ शकतो.   

रहिवाशांनी असा युक्तिवाद केला आहे की, स्टुडिओच्या मागच्या बाजूस असणारे स्टॉर्मवॉटर आऊटलेट (पावसाळ्यात पाणी काढणारे यंत्र) सेंट रोक रोडवरील गटाराल जोडले आहे. याशिवाय मेहबूब स्टुडिओतून बाहेर येणारा कचरा जसा की प्लासस्टिक बॉटल्स, प्लेट्स हे सर्व कॉमन नाल्यात जाऊन मिक्स होतं.

"गेले काही वर्षे ज्याप्रकारे मेहबूब स्टुडिओतील कचरा ज्याप्रकारे गटारात मिक्स होत आहे. त्याप्रकारे COVID 19 केंद्र झाल्यानंतर तिकडचा कचरा स्टॉर्मवॉटर ड्रेन्समध्ये आला तर ते धोकादायक ठरू शकतं," असंही हबर्ट डी यांनी स्पष्ट केलं.

माउंट मेरी रोड इथले रहिवासी डेरेक टॉकर यांनी मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "त्यांनी इतर पर्यायी जागा पालिकेला सुचवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे MET. ही पालिकेचीच जागा आहे. इथं आरामदायी खोल्या आणि शौचालयाची देखील सुविधा आहे."

"दुसरे स्थान ८१ ऑरिएट आहे. एमटीएनएल जवळ ही अवैध इमारत आहे. यामध्ये तयार खोल्या आणि पायाभूत सुविधा आहेत," असं टॉकर म्हणाले.  

स्ट्रीट रोड इथले रहिवासी पीटर गोम्स म्हणाले, "मेहबूब स्टुडिओत चित्रपटांच्या शूटिंग्सना पुन्हा सुरुवात व्हावी, अशी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती."

एच पश्चिमचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितलं की, “अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. इथं अत्यंत गंभीर रुग्ण की लक्षण नाहीत पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना मेहबूब स्टुडिओत ठेवण्यात येईल हे अजून ठरलं नाही. यावर चर्चा सुरू आहे.”



हेही वाचा

धारावीत क्वॉरंटाइनसाठी आणखी ४ हजार ४०७ खाटांची व्यवस्था

नायर रुग्णालयात 2 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी चाचणी यशस्वी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा