मध्य रेल्वे (central railway) 140T क्रेन वापरून अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्स आणि 6व्या लाईन्सचा समावेश असलेल्या ठाणे (thane) स्टेशनवर गर्डर्स (चांदनी बंदर पब्लिक FOB) डी-लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे.
ब्लॉक खालीलप्रमाणे ऑपरेट केला जाईल:
तारीख: 21.09.2024 आणि 22.09.2024 (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)
कालावधी: 22.30 ते 04.30 - (06.00 तास) UP आणि DOWN ट्रान्स-हार्बर लाईन्स आणि 6 व्या लाईनवर
वाहतूक ब्लॉक :
अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्ग: कोपर खैरणे (प्लॅटफॉर्म वगळून) ते ठाणे (प्लॅटफॉर्मसह)
6 वी लाईन: दिवा ते मुलुंड (क्रॉसओव्हर वगळून)
ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील:
अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांची यादी:
6 व्या मार्गावर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा ते मुलुंड/विद्याविहार स्थानकांदरम्यान अप फास्ट लाईनवर वळवण्यात येतील.
11072 कामायनी एक्स्प्रेस
11100 मडगाव- एलटीटी एक्स्प्रेस
12052 मडगाव- मुंबई- जनशताब्दी एक्स्प्रेस
11082 गोरखपूर- एलटीटी एक्स्प्रेस
22120 मडगाव- सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
22537 गोरखपूर- मुंबई कुशीनगर एक्स्प्रेस
11062 जयनगर- एलटीटी एक्स्प्रेस
11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस
18030 शालीमार- एलटीटी एक्स्प्रेस
18519 विशाखापट्टणम -एलटीटी एक्स्प्रेस
20104 गोरखपूर- एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक:
ठाण्याला 22.01 ते 00.05 वाजता सुटणाऱ्या वाशी/पनवेलसाठी उपनगरीय सेवा आणि वाशी येथून 21.37 वाजता सुटणाऱ्या आणि पनवेलहून 23.18 वाजता सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या उपनगरीय सेवा रद्द असतील.
डाउन ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाण्याहून 21.41 वाजता सुटेल आणि वाशीला 22.10 वाजता पोहोचेल.
अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशीहून 21.24 वाजता सुटेल आणि ठाण्याला 21.53 वाजता पोहोचेल.
डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाण्याहून 05.12वाजता निघेल आणि पनवेलला 6.04 वाजता पोहोचेल.
अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशीहून 06.30 वाजता सुटेल आणि ठाण्यात 06.59 वाजता पोहोचेल.
या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सुचनांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा