Advertisement

बीकेसी बेस्ट मार्गिकेची दुर्दशा


बीकेसी बेस्ट मार्गिकेची दुर्दशा
SHARES

वांद्रे - वांद्रे कुर्ला संकुलमध्ये एमएमआरडीएनं ७ किलोमीटर लांबीच्या स्वतंत्र बेस्ट मार्गिका सुरु केल्या आहेत. परंतु या मार्गावर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले असून स्प्रिंग बोलाड्रर्स दोन महिन्यातच वाकल्या आहेत. बीकेसीमध्ये एमटीएनएल जंक्शनपासून कलानगर जंक्शनपर्यंत आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावरील ओएनजीसी इमारतीपर्यंत बेस्ट बससाठी ३.४ मीटरच्या मार्गिका आहे. या मार्गिकेसाठी एमएमआरडीएनं २ कोटी रुपये खर्च केले आहेत. ही मार्गिका एप्रिल २०१६ रोजी सुरू झाल्यापासून या मार्गिकेवर खाजगी गाड्या देखील चालवल्या जात असल्यानं या मार्गिकेमधून बस चालवण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या बेस्ट मार्गिकेमुळे आधीच अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीत भर पडत आहे. एमटीएनएल जंक्शन ते कलानगर जंक्शनपर्यत ही मार्गिका असली तरी तिचा फारसा उपयोग होत नाही. बस चालकांना मात्र बस चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

 

हे ही वाचा- MMRDAच्या करोडो रुपयांचा चुराडा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा