धारावीत देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
पूर्व अफ्रिकेतील टांझानिया इथून आलेला या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला होता. त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे होते. या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नाहीत. या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली गेली आहे.
One #Omicron case found in Dharavi area of Mumbai. The person had returned from Tanzania; now admitted at SevenHills Hospital: BMC (Brihanmumbai Municipal Corporation)
— ANI (@ANI) December 10, 2021
धारावीतील एकाला आणि या अगोदर मुंबईतील दोन जणांना ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झालं आहे.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, धारावीनं यापूर्वीही शून्य रुग्ण आकडा अनेकदा गाठला आहे. धारावी लढलीय त्यामुळं घाबरुन जाऊ नये. या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.