Advertisement

बेस्टच्या बस स्टॉपवरील VOGOची ई-बाईक सेवा बंद

दोन महिन्यांपूर्वी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ला सूचित न करता ऑपरेटरने ई-बाईक सेवा बंद केली.

बेस्टच्या बस स्टॉपवरील VOGOची ई-बाईक सेवा बंद
SHARES

खाजगी ऑपरेटरने मुंबईतील (mumbai) VOGO ई-बाईक स्कूटर्सची सेवा बंद केला आहे. बेस्ट बसस्थानकांवरून कनेक्टिव्हिटीसाठी VOGO स्कूटर्सची सेवा सुरू करण्यात आली होती.

दोन महिन्यांपूर्वी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST)ला सूचित न करता ऑपरेटरने ई-बाईक मागे घेतल्या. या स्कूटर्स अनेक प्रवाशांना कमी अंतराच्या प्रवासासाठी विशेषत: रात्रीसाठी अधिक सोईस्कर ठरत होत्या. 

चलो मोबिलिटी, ज्याने 2022 मध्ये बाईक भाड्याने देणारा VOGO स्टार्टअप सुरू केला आणि बेस्टला सेवा देण्यास सुरुवात केली. या कंपनीने दोन वर्षांपूर्वी सेवा सुरू केली तेव्हा बेस्टकडे 1,000 सिंगल-सीट ई-बाईकची नोंदणी केली होती. दररोज 850 ते 875 बाइक चालवल्या जात होत्या.

मुले किंवा अल्पवयीन तरुण जॉयराइडसाठी बाइक वापरत असल्याच्या तक्रारी, बसथांब्यांसमोर बेशिस्त पार्किंग आणि निकृष्ट देखभाल, यासह इतर तक्रारी अधिक येत होत्या. परंतु तरीही अनेक प्रवाशांना या बाईक्स वाहतुकीसाठी सोयीच्या वाटत होत्या.

एका प्रश्नाला उत्तर देताना, बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, ऑपरेटरने मे महिन्यात मुंबईच्या (mumbai) रस्त्यावरून ई-बाईक (E-Bike) मागे घेतल्या. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही किंवा कोणतीही कारणे देण्यात आली नाहीत. बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, बेस्टने कंपनीला सेवा बंद करण्यास सांगितले नव्हते. तरीही सेवा बंद केली गेली. 

Advertisement

माघारीमुळे बेस्टचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही तसेच इतर कोणत्याही ई-बाईक  (E-Bike) सेवा कंपनीशी संलग्न होण्याची कोणतीही योजना नाही, असेही ते पुढे म्हणाले.



हेही वाचा

मोनोरेलच्या प्रवासी संख्येत सोमवारी 30% वाढ

पालघर : 4 वर्षांच्या मुलीची हत्या करून आदिवासी महिलेची आत्महत्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा