Advertisement

रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्टची संख्या वाढविण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार
SHARES

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य (central railway) आणि पश्चिम रेल्वे (western railway) स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. नव्या वर्षात सरकते जिने, लिफ्टच्या उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे.

मुंबई (mumbai) रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर ही कामे हाती घेतली आहेत. 2027 पर्यंत मोठ्या संख्येने सरकते जिने आणि लिफ्ट प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवासात वेळेची बचत होण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. यामुळे अनेक प्रवाशांचा अपघात होऊन जीव जातो किंवा गंभीर जखमी होतात. असे अपघात रोखण्यासाठी, प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी एमआरव्हीसीचे प्रयत्न सुरू आहेत.

सरकते जिने आणि लिफ्ट बसवून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. एमआरव्हीसीने 2024 सालापर्यंत मुंबईतील (mumbai) विविध उपनगरीय रेल्वे स्थानकांवर 15 लिफ्ट (lifts) आणि 16 सरकते जिने (escalator) यशस्वीरित्या स्थापित केले.

तर, 2024 सालामध्ये 4 नवीन लिफ्ट आणि 9 सरकते जिने उभारले. प्रवाशांना सुरक्षित आणि अधिक सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 2024 सालापर्यंत आणखी 119 लिफ्ट आणि 183 सरकते जिने बसवण्याची योजना आखली आहे.

त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरीय स्थानकांवर एकूण 138 लिफ्ट आणि 208 सरकते जिने उपलब्ध होतील.



हेही वाचा

कोकण मार्गावर विशेष रेल्वेगाडी

चर्चगेटमध्ये बेकायदेशीर विक्रेत्यांवर पालिकेची धडक कारवाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा