Advertisement

पेट्रोल, डिझेलचे भाव पुन्हा वाढले, जाणून घ्या मुंबईतील दर

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

पेट्रोल, डिझेलचे भाव पुन्हा वाढले, जाणून घ्या मुंबईतील दर
SHARES

पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum Company) पुन्हा पेट्रोल (petrol) आणि डिझेल (diesel) चे दर वाढवले आहेत. दोन दिवस दर स्थिर ठेवल्यानंतर शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २८ पैशांनी महाग केलं आहे.

मुंबईत (mumbai) आता एक लीटर पेट्रोलचा भाव १००.९८ रुपये झाला आहे. तर लीटर डिझेलचा भाव ९२.९९ रुपयांवर गेला आहे. दिल्लीत (delhi) पेट्रोल ९४.७६ रुपये तर डिझेलचा भाव ८५.६६ रुपये आहे. चेन्नईत (chennai) पेट्रोलचा भाव ९६.२३ रुपये आणि डिझेलचा दर ९०.३८ रुपये झाला आहे. तर कोलकात्यात (kolkata) पेट्रोलचा भाव ९४.७६ रुपयांवर आणि डिझेल ८८.५१ रुपयांवर गेले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०२.८९ रुपये असून डिझेल ९४.१९ रुपये झाले आहे.

महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्या वर गेले आहेत. अमरावती, औरंगाबादमध्ये , भंडारा, बुलढाणा, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, नंदुरबार, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापर, वर्धा, वाशीम, ठाणे, मुंबई या शहरांमध्ये आता पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. 

४ मे पासून देशात इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.

जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 



हेही वाचा - 

Covid-19 ने मृत्यू झाल्यास ५ वर्ष कुटुंबीयांना मिळणार पगार, रिलायन्सची मोठी घोषणा

मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क २ टक्के करा, क्रेडाय-एमसीएचआयची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा