राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘नव भारत गव्हर्नन्स अवॉर्ड्स २०२१’ पुरस्कार प्रदान केले. शनिवार २० नोव्हेंबर रोजी राजभवन येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘रामराज्य’ या दिवाळी विशेषांकाचेही राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ‘रामराज्य’ दैनिक नवराष्ट्राने प्रसिद्ध केले आहे.
या पुरस्कार सोहळ्याला अनेकांनी उपस्थिती दर्शवली. मुख्य सचिव सीताराम कुंटे, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, म्हाडाचे सीईओ व व्हीपी अनिल डिग्गीकर, पर्यावरण व हवामान बदलाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाप्रीतचे सीएमडी बिपीन श्रीमाळी, ऊर्जा प्रधान सचिव दिनेश वाघमारे, एमडीसीचे उपाध्यक्ष राधाकृष्णन, उपमहापौर डॉ. मोपलवार, सिडकोचे उपाध्यक्ष संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त बीएमसी सुरेश काकाणी, नागपूर महानगरपालिका आयुक्त बी राधाकृष्णन, सहकार आयुक्त अनिल कवाडे, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे, शिर्डी साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र मिलिंदकर, कलेक्टर मिलिंदकर आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला.
नवभारत समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी यांनी स्वागत केले तर अध्यक्ष विवेक प्रसाद यांनी आभार मानले.