परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे. तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला हिरवा कंदील दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी दिली असली तरी कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणं अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
Govt of India has decided to resume scheduled commercial international passenger services to/from India from 27.03.2022. International operations shall be subject to strict adherence to Ministry of Health guidelines for international travel: Civil Aviation Ministry pic.twitter.com/3dfVgTbrm0
— ANI (@ANI) March 8, 2022
हवाई वाहतूक राज्यमंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, देशातील कोरोनाचा रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय वाहतूक नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर एअर बबल देखील बंद करण्यात येईल.
या अगोदर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२२ पासून आंतरराष्ट्र विमानसेवेला बंदी घातली होती. त्याअगोदर २८ फेब्रुवारीला डीजीसीएनं कमर्शिअल आंतरराष्ट्रीय विमानसेवेला पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
हेही वाचा