Advertisement

कमला मिल्स अग्नितांडवः या सेलिब्रेटींनी व्यक्त केला संताप


कमला मिल्स अग्नितांडवः या सेलिब्रेटींनी व्यक्त केला संताप
SHARES

लोअर परळ इथल्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये वन अबव्ह पबला गुरुवारी रात्री भीषण अाग लागली. या अग्नितांडवामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ पेक्षा अधिक जण जखमी झाले अाहेत. मोकळ्या जागेचा वापर अनधिकृतपणे करून वन अबव्ह क्लबचं बांधकाम करण्यात अालं होतं. यापूर्वी कारवाई करून हे बांधकाम तोडण्यात अालं होतं. मात्र त्यानंतरही ते पुन्हा उभारण्यात अालं. मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवूनही त्याची दखल घेण्यात अाली नाही. परिणामी, अग्नितांडवाला सामोरं जावं लागलं. मात्र अाता गप्प बसून चालणार नाही. अाता अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडलाच पाहिजे. अशी प्रतिक्रिया अाता मराठी चित्रपटसृष्टीतून उमटू लागली अाहे. मराठी सेलिब्रेटींनीही कमला मिल्स अागीप्रकरणी संताप व्यक्त केला अाहे.


रेणुका शहाणेने अधिकाऱ्यांना ठरवले दोषी

कायम संवेदनशील घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या रेणुका शहाणे यांनी ट्विटर अाणि फेसबुकच्या माध्यमातून अापला राग व्यक्त केला अाहे. बिल्डर, रेस्टाॅरंटचे मालक, नगरसेवक, बीएमसी अधिकारी यांच्यातील 'अर्थपूर्ण' मैत्रीमुळे मुंबईकरांचा नाहक बळी गेला अाहे. बेकायदेशीर बांधकाम, भ्रष्टाचार यामुळे अापले अायुष्य हरवत चालले अाहे, अशा शब्दांत रेणुका शहाणे यांनी पदाधिकाऱ्यांना फैलावर धरले.




सर्वांनी काळजी घ्या - हृता दुरगुळे

'फुलपाखरू' फेम हृता दुरगुळे हिनेही कमला मिल्स अागीत मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला अाहे. कमला मिल्स अग्नितांडव सुरू अाहे, सर्वांनी अापली काळजी घ्या, असं ट्विट तिने केलं होतं.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा