Advertisement

एकनाथ शिंदेंवरील टीकेमुळे चर्चेत आलेला कुणाल कामरा कोण?

कुणाल कामरा हा जेवढा त्याच्या कॉमेडिसाठी लोकप्रिय आहे तेवढाच तो वादामुळेही प्रसिद्धीस येत आहे.

एकनाथ शिंदेंवरील टीकेमुळे चर्चेत आलेला कुणाल कामरा कोण?
SHARES

कुणाल कामरा हा जेवढा त्याच्या कॉमेडीसाठी लोकप्रिय आहे तेवढाच तो वादामुळेही प्रसिद्धीस येत आहे. कारण त्याचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो शिवसेनेचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक वक्तव्य करताना दिसतो. त्यातून आता वाद निर्माण झाला असून शिवसेनेकडून कुणाल कामराविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आली आहे.

कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या राजकारण्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा वादात सापडला आहे.

कुणाल कामरा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 रोजी माहिम येथे झाला. कामरा मुंबईत लहानाचा मोठा झाला आणि त्याने वाणिज्य शाखेत जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. प्रसून पांडे यांच्या कॉर्कोइस फिल्म्स या जाहिरात चित्रपट हाऊस प्रोडक्शनमध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी त्यांनी पदवीच्या दुसऱ्या वर्षात अभ्यास सोडला, जिथे त्यांनी अकरा वर्षे काम केले.

कुणाल कामरा प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन, राजकीय व्यंगचित्रकार, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. सोशल मीडियावर कुणाल कामराचे लाखो फॉलोअर्स आहेत. बिनधास्त राजकीय व्यंगांसाठी तो ओळखला जातो.

अनेकदा सरकार, राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींवर कॉमेडीच्या माध्यमातून तो टीका करतो. 2020 मध्ये कुणालनं सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांवर टीका करणारे ट्विट्स केले होते. त्यानंतर कुणाल विरुद्ध अवमानाचा खटला दाखल झाला होता.

28 जानेवारी 2020ला पत्रकार अर्णब गोस्वामींसोबत इंडिगोच्या विमानात वाद झाला. वादानंतर कुणालवर काही विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली. कामराने मतांवर ठाम राहण्याची भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला.

1 मार्च 2017 ला युट्यूबर "देशभक्ती आणि सरकार" नावाचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओतून नोटबंदीवरून सरकारची खिल्ली त्याने उडवली होती. विश्व हिंदू परिषदेनं अनेकदा कुणालचे शो बंद पाडले होते. कॉमेडीतून टीका केल्यानं कुणाललाअनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या आहेत.



हेही वाचा

सुशांत सिंहची आत्महत्याच!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा