Advertisement

Lockdown in Kalyan Dombivali : कल्याण-डोंबिवलीतील ‘या’ प्रभागांमध्ये ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन

लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला तरी काही कंटेन्मेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

Lockdown in Kalyan Dombivali :  कल्याण-डोंबिवलीतील ‘या’ प्रभागांमध्ये ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन
SHARES

कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. १२ जुलै ते १९ जुलै या कालावधीसाठी महापालिका क्षेत्रात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. मात्र, लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला तरी काही कंटेन्मेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रात सुरूवातीला २ ते १२ जुलै या कालावाधीत लॉकडाउन  होता. त्यानंतर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन १२ जुलैपासून लॉकडाउनला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर महापालिकेनं लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याबद्दलचे आदेश काढले असून, कंटेनमेंट झोनला यातून वगळण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

लॉकडाऊनचे प्रभाग

टिटवाळा गणेश मंदिर (१/अ प्रभागक्षेत्र)

मोहने गावठाण (१/अ प्रभागक्षेत्र)

शहाड (१/अ प्रभागक्षेत्र)

गांधारे (२/ब प्रभागक्षेत्र)

बारावे गोदरेज हिल (२/ब प्रभागक्षेत्र)

खडकपाडा (२/ब प्रभागक्षेत्र)

वायले नगर (२/ब प्रभागक्षेत्र)

फडके मैदान (२/ब प्रभागक्षेत्र)

रामदासवाडी (२/ब प्रभागक्षेत्र)

रामबाग सिंडीकेट (२/ब प्रभागक्षेत्र)

बेतुरकरपाडा (३/क प्रभागक्षेत्र)

चिखलेबाग-मल्हार नगर (३/क प्रभागक्षेत्र)

अहिल्याबाई चौक (३/क प्रभागक्षेत्र)

जोशीबाग (३/क प्रभागक्षेत्र)

बैलबाजार (३/क प्रभागक्षेत्र)

गोविंदवाडी (३/क प्रभागक्षेत्र)

कोळसेवाडी (४/जे प्रभागक्षेत्र)

कचोरे (४/जे प्रभागक्षेत्र)

लोकग्राम (४/जे प्रभागक्षेत्र)

शास्त्रीनगर-तिसगाव (५/ड प्रभागक्षेत्र)

संतोषनगर-तिसगाव (५/ड प्रभागक्षेत्र)

नेहरूनगर (५/ड प्रभागक्षेत्र)

विजय नगर (५/ड प्रभागक्षेत्र)

कांचनगाव खंबालपाडा (६/फ प्रभागक्षेत्र)

चोळेगाव (६/फ प्रभागक्षेत्र)

पेंडसे नगर (६/फ प्रभागक्षेत्र)

टिळकनगर (६/फ प्रभागक्षेत्र)

सारस्वत कॉलनी (६/फ प्रभागक्षेत्र)

गोग्रासवाडी (६/फ प्रभागक्षेत्र)

गरीबाचा वाडा (७/ह प्रभागक्षेत्र)

देवीचा पाडा (७/ह प्रभागक्षेत्र)

जय हिंद कॉलनी (७/ह प्रभागक्षेत्र)

विष्णू नगर (७/ह प्रभागक्षेत्र)

कोपररोड (७/ह प्रभागक्षेत्र)

जुनी डोबिंवली (७/ह प्रभागक्षेत्र)

राजाजी पथ (८/ग प्रभागक्षेत्र)

म्हात्रेनगर (८/ग प्रभागक्षेत्र)

तुकाराम नगर (८/ग प्रभागक्षेत्र)

रघुवीर नगर (८/ग प्रभागक्षेत्र)

पांडुरंगवाडी (८/ग प्रभागक्षेत्र)

पिसवली (९/आय प्रभागक्षेत्र)

चिंचपाडा-नांदीवली (९/आय प्रभागक्षेत्र)

दावडी (९/आय प्रभागक्षेत्र)

आजदे (१०/ई प्रभागक्षेत्र)

डोबिंवली एमआयडीसी (१०/ई प्रभागक्षेत्र)

सागाव-सोनारपाडा (१०/ई प्रभागक्षेत्र)

नांदीवली-पंचानद (१०/ई प्रभागक्षेत्र)

भोपर-संदप (१०/ई प्रभागक्षेत्र)



हेही वाचा -

Kalyan Dombivali Hotspot List : कल्याण-डोंबिवलीत 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा