पाण्याचं २४ हजार ९१६ रुपयांचं बिल थकवल्याने मुंबई महापालिकेकडून (bmc) चक्क मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला डिफाॅल्टर घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासोबतच इतर मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी देखील थकली असून ही रक्कम एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही माहिती उघड झाल्याने यावरून आरोप-प्रत्यारोप धार चढली आहे.
'माहिती अधिकार' कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळवरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) (वर्षा बंगला), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी (तोरणा), अर्थमंत्री अजित पवार (देवगिरी), जयंत पाटील (सेवासदन), नितीन राऊत, उर्जा मंत्री (पर्णकुटी), बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट), राजेंद्र शिंगे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागीरी), छगनराव भुजबळ (रामटेक), रामराजा निंबाळकर विधानभवन सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृहची नावं आहेत.
हेही वाचा- आजपासून हिवाळी अधिवेशन गाजणार, 'या' अध्यादेशांवर होणार चर्चा
शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामन्य जनते का भरावं ? तसंच महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचं पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का? असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी सरकारला विचारला आहे.
पाणीपट्टी थकवण्यासोबत मंत्र्यांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या डागडुजीवरून देखील विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. कोरोना संकटाच्या काळात शासकीय तिजोरीत खडखडाट असताना बंगल्याच्या डागडुजीवर वायफळ खर्च कशासाठी करण्यात आला, यावरून विरोधक सरकारला धारेवर धरत आहे. तब्बल ९० कोटी रुपयांहून अधिक खर्च या कामांपोटी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर आता सरकारकडून उत्तर येणं अपेक्षित आहे.
(maharashtra cm uddhav thackeray varsha bungalow in defaulter list in bmc for not paying water bill)
हेही वाचा- अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत IMD चा मुंबईकरांना इशारा