मालाड - मालाड पश्चिमेकडील गोरेगाव मुलूंड लिंकरोडवरची पाईपलाईन गेली अनेक दिवस फुटली आहे. या जलवाहिनीतून पाण्याची गळती होत असून हे पाणी थेट नाल्यात जाते. त्यामुळे पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होत आहे. जलवाहिनीखालील नाल्याचे झाकण उघड्या स्थितीत असून त्यात मोठया प्रमाणात कचरा साचला आहे. तसेच या मार्गावरून प्रवास करताना एखादा पादचारी तोल जाऊन पडण्याची शक्यता आहे. पी उत्तर आणि पी दक्षिण पालिका विभागाच्या हद्दीवरून वाद सुरु असल्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.