Advertisement

एपीएमसीच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे.

एपीएमसीच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली
SHARES

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. आंब्याची आवक दिवसागणिक वाढतच असल्यानं आंब्याचे दर देखील वाढले आहेत. आगामी काही दिवसात आवक स्थिरावल्यानंतर आंब्याचा आनंद सामान्यांना घेता येईल, असा अंदाज व्यापारी वर्गानं व्यक्त केला आहे. फळ मार्केटमध्ये १४ मार्चच्या रात्रीपर्यंत २६ ट्रक आणि ४१७ लॉरी अशा एकूण ४४३ गाड्यांची आवक झाली आहे. महाराष्ट्रातून २३०३७ तर इतर राज्यातून ६५८२ क्रेट आंबा बाजारात दाखल झाला आहे.

रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची अधिक आवक बाजारात दाखल झाली आहे. बाहेरील ६ हजार क्रेटमध्ये कर्नाटक आणि केरळचा आंबा आहे. मागील आठवड्यापेक्षा केरळ आणि कर्नाटक आंब्याची आवक घटली असून हापूस आंबा आवक मात्र ६ हजार पटीनं वाढली आहे.

देवगड हापूस ५ डझनाच्या पेटीला ८०० ते २५०० हजार रुपये भाव आहे. तर कर्नाटक आणि केरळ आंबा १०० ते १५० रुपये प्रति किलोनं विकला जात आहे. रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दिवसेंदिवस वाढत चालला असून लवकरच आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणार असल्याची खात्री दिली जात आहे. इतर फळ विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी फळांच्या राजाला मात्र मागणी वाढू लागली आहे.

मागील वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे एपीएमसी बाजारपेठेत आंब्यांची होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली होती तर त्यानंतर राज्यातील हवामान बदलाचा फटका आंब्यासह इतर शेती उत्पादनाला बसला होता. हवामान बदलाचा फटका यंदाही शेतकर्‍यांना बसला असून आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याचं समजतं.

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी आणि देवगड परिसरात आंबा पीक कमी असल्याचे बोलले जात आहे. तर, एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा आवक वाढेल.



हेही वाचा -

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा