Advertisement

वांद्र्याचा चिंबई बीच की कचराकुंडी?


वांद्र्याचा चिंबई बीच की कचराकुंडी?
SHARES

मुंबईचे बीच आणि त्यावरची अस्वच्छता हा विषय नेहमीच चर्चेचा ठरतो. पण आता तो मुंबईकरांसाठी काळजीचा बनला आहे. कारण दिवसेंदिवस मुंबईच्या बीचवर जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे शहराचा कोंडणारा श्वास धोक्याची घंटा ठरु लागला आहे. वांद्र्यातल्या चिंबई बीचची अवस्था याहून काही वेगळी नाही.

पावसाळ्यात चिंबई बीचवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. हा कचरा साफ करण्यासाठी काही सफाई कर्मचारी काम करत असतात. मात्र ते पुरेसे ठरत नाहीत. त्यामुळे पालिकेने यावर ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे.

थेल्मा पुजारी, स्थानिक


काही लोकं कोस्टल रोडच्या गप्पा मारत आहेत. पण शहरात वाढणाऱ्या प्रदूषणाचं काय? शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्याच प्रमाणात प्रदूषणही वाढत आहे. चिंबई बीचबद्दल पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही.

आसिफ झंकारिया, स्थानिक नगरसेवक


वारंवार पाठपुरावा, परिणाम शून्य

वांद्रे जॉगर्स पार्क आणि वांद्रे प्रोमेनाडमधला भाग म्हणजे चिंबई बीच. या भागाला बीच जरी म्हटलं जात असलं, तरी हा कचराकुंडीपेक्षा कमी नाही. इथे बीचच्या वाळूपेक्षा प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कागदी कचराच जास्त आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करुनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.


शहरात कचरा व्यवस्थापनासाठी योग्य यंत्रणाच नाही की काय असाच प्रश्न आहे. कारण चिंबई बीचची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पालिका या कामासाठी संसाधनांवर करत असलेला खर्च वायाच जात असल्याचं दिसून येत आहे.

डॅमियन सब्रल, स्थानिक



हेही वाचा

कचराऱ्याची विल्हेवाट लावा, नाहीतर गुन्हा दाखल होईल!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा