बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मलबार हिलमधील शहराच्या पहिल्या फॉरेस्ट वॉकवेची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. तथापि पेंटिंग, शौचालये बसवणे, इलेक्ट्रिकल काम आणि तिकीट काउंटर उभारणे यासारखी अतिरिक्त कामे अजूनही सुरू आहेत.
हा फॉरेस्ट वॉकवे 705 मीटर लांब असेल. तसेच तो मलबार हिलच्या जंगलातून जाईल. कमला नेहरू पार्कच्या मागे सिरी रोडवर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग असतील. या वॉकवेच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ग्लास-बॉटम डेक जे जंगल आणि अरबी समुद्राच्या रोमांचक दृश्याचा अनुभव देणार आहे.
या वॉकवेवर पक्षी निरीक्षण क्षेत्र देखील असेल. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि स्थानिक वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी लाकडाचा वॉकवे डेक बनवलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी एकही झाड तोडण्यात आलेले नाही. हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने आणि शांतता क्षेत्राची मान्यता असल्याने कडक उपाययोजनांचे पालन करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि आगामी विधानसभा निवडणुकांमुळे या वॉकवेच्या कामाची प्रगती मंदावली आहे. असे असूनही, हा प्रकल्प वर्षाअखेरीस सार्वजनिक वापरासाठी खुला करण्याचे लक्ष्य आहे.
एलिव्हेटेड वॉकवेची कल्पना 2020 मध्ये पालिकेकडून सुचवण्यात आली होती. सिंगापूरमधील वॉकवेची प्रेरणा घेऊन 2021 मध्ये 22 कोटी रुपयांची निविदा या वॉकवेसाठी देण्यात आली होती. या वॉकवेचे 2022 मध्ये बांधकाम सुरू झाले होते.
शिवाय, पालिकेने नुकतेच 2.43 कोटी रुपयांच्या किमतीची बोली लावली. या पैशाचा वापर पदपथाची स्वच्छता आणि देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी केला जाईल.
सुरुवातीला हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, बांधकामाला अधिक कालावधी लागला आहे. सध्या 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व कामकाज नियोजनानुसार पार पडल्यास डिसेंबरमध्ये या पदपथाचे उद्घाटन करण्यात येईल.
हेही वाचा