Advertisement

हाजी अली दर्गा रस्त्याचे रुंदीकरण होणार

या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीने मंजूर केलेला हा प्रकल्प PWD 19 कोटी रुपये खर्च करुन उभा करणार आहे.

हाजी अली दर्गा रस्त्याचे रुंदीकरण होणार
SHARES

हाजी अली (haji ali) दर्ग्याकडे जाणारा मार्ग 5 मीटरवरून त्याची रुंदी 10 मीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दर्गा व्यवस्थापनेच्या विनंतीला प्रतिसाद देत रस्त्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. भरती-ओहोटी पासून भाविकांचे रक्षण करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे.

या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीने मंजुरी दिलेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी PWD च्या हार्बर इंजीनिअरिंगच्या मार्फत 19 कोटी रुपये खर्च करून केली जाणार आहे. 

विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब ननावरे म्हणाले, “आम्ही प्रवेश रस्ता रुंद करू आणि रस्त्याची झिज होण्यापासून रोखण्यासाठी टेट्रापॉड बसवू. जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून खर्चाची रक्कम मंजूर करून 18 महिन्यांत काम पूर्ण केले जाईल.''

दर्गा वरळीच्या किनाऱ्यापासून 500 मीटर अंतरावर एका बेटावर आहे. दर्ग्याला किनाऱ्याशी जोडणारा सध्याचा मार्गावर शुक्रवारी प्रचंड गर्दी असते. 4.5 मीटर रुंदीच्या या मार्गाला रेलिंग नाही. भाविकांसाठी हे जास्त धोकादायक आहे. यामुळे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. 

प्रस्तावित प्रकल्पामध्ये मार्गाच्या दोन्ही बाजूला 264 मीटर लांबीच्या संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. या मार्गाची उंचीही सात मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर (CWPRS)ने या डिझाइनला आधीच मान्यता दिली आहे.

दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खांडवानी (suhel khandwani) म्हणाले, “सरकारकडून संपूर्ण मार्गाचे सुशोभीकरण केले जाईल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि अस्लम शेख (Aslam sheikh) या दोन लोकांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.’’



हेही वाचा

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार

नालेसफाईबाबत महापालिकेने केलेल्या दाव्याची काँग्रेसकडून पोलखोल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा