Advertisement

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट राहणार बंद

पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट राहणार बंद
SHARES

मुंबई-नाशिक महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुढील काही दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत या महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. 

मुंबई नाशिक या महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढली जाणार आहेत.

24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तर 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

यावेळी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असून या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई मार्गिके वरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे.

लहान वाहनाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. परंतु, या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई, पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळवण्यात येणार आहेत.



हेही वाचा

मुंबईतील मरीन ड्राइव्ह लवकरच 110 एलईडी दिव्यांनी उजळणार

आता 3 दिवस आधी अनारक्षित तिकिट बुक करू शकता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा