Advertisement

मुंबईतील तापमानाचा पारा 15 अंशांवर घसरला

रविवारी 5 जानेवारी रोजी मुंबईच्या भागात अवकाळी रिमझिम पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी 6 जानेवारीच्या सकाळपर्यंत किमान तापमानात घसरण झाली होती.

मुंबईतील तापमानाचा पारा 15 अंशांवर घसरला
SHARES

रविवारी, 5 जानेवारी रोजी मुंबईच्या (mumbai) काही भागात अवकाळी स्वरुपाचा रिमझिम पाऊस पडला. यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी 6 जानेवारीच्या सकाळपर्यंत किमान तापमानात (temperature) घसरण झाली होती.

यासह, शहरामध्येही गेल्या काही दिवसांपासून दिवसाच्या तापमानात बदल (mumbai weather update) झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात शहरात आणखी एक थंडीची (cold) लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

सोमवारी 6 जानेवारी रोजी मुंबईत अवघ्या तीन दिवसांतील नोंदवलेल्या कमाल तापमानात 6 अंश सेल्सिअसची मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (india meteorological department) सांताक्रूझ वेधशाळेच्या अहवालानुसार शहराचे कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

4 जानेवारी रोजी 36 अंश सेल्सिअस होते. तसेच MET ब्युरोच्या नोंदीनुसार 2016 पासून हा जानेवारीचा सर्वात उष्ण दिवस होता. तर, किमान तापमान 16.8 अंश सेल्सिअस होते, जे आदल्या दिवशी 19 अंश सेल्सिअस होते.

मंगळवारी, 7 जानेवारी रोजी सकाळी किमान तापमानात आणखी घसरण नोंदवली गेली आहे. सांताक्रूझ वेधशाळेने 15.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले; तर कुलाबा वेधशाळेने 18.6 अंश सेल्सिअस नोंदवले.

7 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान किमान तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे.

आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील, मात्र आठवड्याच्या शेवटी मुंबईतील आकाशात धुके असण्याची शक्यता आहे. शिवाय तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

बोरिवली, भायखळ्यातील बांधकामे निर्बंधमुक्त

8 खासदार अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा