मराठी नववर्षाची सुरुवात येत्या गुढीपाडव्यापासून होत आहे. या निमित्ताने राज्यातील परिवहन विभागाने नोंदणी केलेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर मराठीत सामाजिक संदेश लिहावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठी ही महाराष्ट्र (maharashtra) राज्याची राजभाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
मराठी (marathi) भाषेचे जतन करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. तथापि, राज्यात नोंदणीकृत अनेक व्यावसायिक वाहनांवर हिंदी किंवा इतर भाषांमध्ये सामाजिक संदेश, जाहिराती आणि शैक्षणिक माहिती लिहिलेली असते. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारावर मर्यादा येतात.
सामाजिक संदेश, जाहिराती आणि शैक्षणिक माहिती मराठीत प्रदर्शित केल्याने महाराष्ट्रातील लोकांना अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होईल. याशिवाय मराठी भाषेलाही योग्य तो आदर दिला जाईल.
यासाठी, प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी परिवहन आयुक्तांना येत्या गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत सर्व व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश तसेच इतर महत्त्वाची जाहिरात आणि शैक्षणिक माहिती मराठीत लिहिण्याची पद्धत लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा