Advertisement

तारापूर औद्योगिक वसाहतमधील केमिकल कंपनीतील स्फोटात २ ठार

सुमारे १५ किलोमीटरचा परिसर स्फोटाच्या आवाजानं हादरला. या स्फोटानंतर निर्माण झालेली वायु दुर्गंधी देखील दूरवर येत होती.

तारापूर औद्योगिक वसाहतमधील केमिकल कंपनीतील स्फोटात २ ठार
SHARES

पालघर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या नंडोलिया ऑरगॅनिक केमिकल कंपनीत सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर अनेक कामगार जखमी झाले आहेत.


या स्फोटाचा हादरा बोईसर औद्योगिक क्षेत्राच्या आसपासच्या परिसरातल्या बोईसर, धनानीनगर, चिंचणी, पास्थळ आणि इतर जवळपासच्या भागांत जाणवला. सुमारे १५ किलोमीटरचा परिसर स्फोटाच्या आवाजानं हादरला. या स्फोटानंतर निर्माण झालेली वायु दुर्गंधी देखील दूरवर येत होती.


रासायनिक प्रक्रियेदरम्यान औद्योगिक वसाहतीमधील टी-१४१ प्लॉटमधील  रिअॅक्टरमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळं कंपनीत काम करणारे तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांमध्ये मोहम्मद मोसिन अल्ताभ (३०), दिलीप गुप्ता (२८) व उमेश कुशवाहा (२२) या तिघांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटाच्या वेळी कंपनीमध्ये १४ कामगार होते.



हेही वाचा -

Ganeshotsav 2020: कोरोनामुळं ग्राहकांची सजावटीच्या सामानाच्या खरेदीकडे पाठ

मुंबईत थेट विसर्जनाला बंदी, पालिकेनं दिले 'हे' पर्याय




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा