अभिनेता कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी एका वकिलानं केली आहे. यासीठी वकिलानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कंगनाची बहिण रगोली चंदेलविरोधात फौजदारी तक्रारी नोंदवणारे वकील काशिफ अली खान देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत वकिलांनी असं म्हटलं आहे की, “देशात द्वेष पसरवण्यापासून थांबवण्यासाठी आणि लोकांमध्ये फूट पाडण्याच्या कामापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.”
या याचिकेत असं म्हटलं आहे की, Twitter Inc. ne देखील टॅग करण्यात आलं आहे. तिनं केलेल्या ट्विटरवर आक्षेप घेतला तरी कुठल्ही प्रकारची कारवाई घेतली गेली नाही. याशिवाय सोशल मीडियावर द्वेष निर्माण करणाऱ्या वापरकर्त्यांना समुदाय मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी ट्विटरकडे दिशा-निर्देश मागितले आहे.
तिनं केलेल्या ट्वीटविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याशिवाय याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे की, ट्विटर अकाउंट निलंबित करण्यासाठी ट्विटर इन्क. च्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील कार्यालयातील अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आहे. तथापि, कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांनी हायकोर्टाकडे जाऊन ट्विटर इंकला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २२६ आणि कलम ४८२ ला आव्हान दिलं आहे.
एप्रिल महिन्यात कंगनाची बहिण रंगोली चंदेलच्या ट्विटचा संदर्भ देताना म्हटलं आहे की, तिचे खाते निलंबित झाल्यानंतर कंगनानं एका व्हिडिओद्वारे बहिणीच्या समर्थनार्थ भाष्य केलं होतं.
१५ एप्रिल रोजी रंगोलीनं केलेल्या ट्विटचा याचिकेत उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये तबलीघी जमात सदस्यास लक्ष्य केलं होतं. त्यामुळे त्यांचे खाते निलंबित केले गेलं होतं. तिच्या बहिणीच्या पोस्टला पाठिंबा देत कंगनानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
हेही वाचा