Advertisement

यंदा मार्च महिन्यात कैऱ्यांच्या मागणीत वाढ

सध्या मार्च महिना सुरु असून अवघे काहीच दिवस आंब्याचा मौसमाला उरले आहेत. असं असतानाच कैऱ्यांची मागणी वाढली आहे.

यंदा मार्च महिन्यात कैऱ्यांच्या मागणीत वाढ
SHARES

सध्या मार्च महिना सुरु असून अवघे काहीच दिवस आंब्याचा मौसमाला उरले आहेत. असं असतानाच कैऱ्यांची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं सध्या दर चांगलेच वधारलेले आहेत. मुंबईत दरवर्षी साधारणत: मार्च महिन्याच्या अखेरीस कैऱ्यांची मागणी वाढू लागते. यंदा मात्र उन्हाचे चटके काहीसे लवकर जाणवू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी मार्च महिन्यात दररोज जेमतेम १० ते १२ किलो कैरी विकली जाते. मात्र, यंदा दररोज १५ किलोहून अधिक मागणी आहे. यंदा नवी मुंबईतून कैऱ्यांची आवक कमीच आहे. अनेक जण थेट कोकणातून कैरी मागवत आहेत. दररोज साधारण २ ते ३ टेम्पो कैरी बाजारात येत आहे. मागणी मात्र सुमारे चार टेम्पो इतकी आहे. त्यामुळे दर वधारलेले आहेत.

एका टेम्पोमध्ये साधारण ५०० ते ७०० किलो कैरी असते. त्यानुसार दररोज १२०० ते १४०० किलो कैरी भायखळा बाजारात येत असताना त्या तुलनेत मागणीही सुमारे २ हजार किलो इतकी आहे. त्यामुळे घाऊक बाजारातच कैरी किमान ६५ ते ७० रुपये किलो आहे. वाहतुकीचा खर्च पकडून किरकोळ व्यापाऱ्यालाच ती ८० ते ८५ रुपये किलोने पडते. त्यामुळे बाजारात ग्राहकांना ती १०० ते १२० रुपये किलोनं विक्री होत आहे.

हापूस २ हजार रु. डझन

उन्हाळ्यात मुंबईत वास्तवात सहा ते आठ प्रकारचे आंबे येतात. यंदा मात्र सध्या तरी फक्त रसाचा आंबा म्हणून ओळख असलेला बदामी आंबा काही प्रमाणात येऊ लागला आहे. सुरुवात असल्याने सध्या त्याचा दर १२० ते १३० रुपये किलो आहे. तर हापूस २ हजार रुपये डझनच्यावर आहे.



हेही वाचा - 

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं सरकारला पत्र

सचिन वाझेंच्या सोसायटीमधून सीसीटीव्ही, डीव्हीआर गायब


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा