मानखुर्दमधील मशींदीच्या भोंग्या विरोधात करिश्मा भोसले या तरुणीने काही दिवसांपूर्वी आवाज उठवला होता. त्यावेळी तिच्या विरोधात मानखुर्द पोलिसांनी १४९ (cognisable offences) अंतर्गत नोटीस पाठवली आहे. दरम्यान पालिकेच्या एम पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी मल:निसारण वाहिनीच्या व्हेंट पाईपवरील भोंगा काढण्याबाबतची जाहिर नोटीस लावण्यात आली आहे. तसेच ४८ तासात हा भोंगा न काढल्यास पालिकेच्या अधिनियमातील असलेल्या तरतुदीनुसार हा भोंगा काढण्यात येईल असे म्हटलं आहे.
Yes now Police & BMC put Public Notice to remove the illegal Loudspeaker in front of Karishma Bhosle residence/building at Mankhurd
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 30, 2020
आता मानखुर्द येथील करिश्मा भोसले यांचा घरा समोरचा बेकायदा लाऊडस्पीकर भोंगा हटवण्यासाठी पोलिस आणि महानगरपालिकेने जाहीर नोटीस दिली आहे @Dev_Fadnavis pic.twitter.com/LvvU9zLT8b
मानखुर्दच्या मशीदीवरील भोंद्यावरून करिश्माने मशिदीत जाऊन तेथील स्थानिकांना भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. त्यावरून करिश्मा आणि स्थानिकांमध्ये शाब्दीक वाद झाला. सोशल मिडियावर या गोष्टीची सर्वत्र चर्चा होऊ लागली. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनीही करिश्माला १४९ अंतर्गत नोटीस बजावली. त्यानंतर करिश्माने एक व्हिडिओ ही शेअर करत, तिचे मत मांडले होते. त्या व्हिडिओत तिने माझा अजानला विरोध नाही, मी त्या ठिकाणी फक्त भोंग्याचा आवाजा कमी करण्याची विनंती केली. मात्र स्थानिकांनी त्यावरून माझाशी वाद घातला. आमचं कोणाशी शत्रुत्व नाही. अजानला ही विरोध नाही. मात्र लाऊडस्पिकरवर अजान आवाजातून होते त्याला विरोध आहे. अशा स्पष्ठ शब्दात तिने तिची भूमिका सोशल मिडियावर व्हिडिओ अपलोड करून व्यक्त केली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर तिला स्थानिकांकडून ही धमकीचे फोन येऊ लागले. कालांतराने या वादात राजकिय नेत्यांनी ही उडी घेतली.
हेही वाचाः- मानखुर्दच्या गतीमंद बालसुधारगृहात आणखी चौघांना कोरोना
वातावरण चिघळत असल्याने अखेर पोलिसांनी या प्रकरणी करिश्माला नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये पोलिसांनी करिश्माने मशिदीला भेट देणं अयोग्य आहे. तिला कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास तिने प्रथम पोलिसांकडे यायला हवे, थेट मशिदीत जाऊन लाऊडस्पिकरचा आवाज कमी करण्याची विनंती केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने पोलिसांनी करिश्मा आणि तिच्या आईला कलम १८८ नुसार नियमांचेपालन न केल्याप्रकरणी नोटीस पाठवून त्यांना समज देण्यात आलेली आहे. वेळ पडल्यास पोलिस त्यांच्यावर गुन्हा ही नोंदवू शकतात असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.
हेही वाचाः- कोरोनाच्या नव्या रुग्णांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा, पहा तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले
दरम्यान पालिकेच्या एम पूर्व विभागाने मल:निसरण लाईनच्या व्हेंटला लावण्यात आलेल्या भोंग्या खाली एक जाहिर नोटीस लावलेली आहे. त्या नोटीसमध्ये पालिकेच्या अधिनियमांतर्गत असलेल्या तरतुदीनुसार हा भोंगा लावण्यात आला असून ४८ तासात हा भोंगा काढण्यात यावा. अन्यथा पालिका पुढील कोणतिही सुचना न देता. तो भोंगा काढण्यात येईल असे जाहिर सूचनेत म्हटले आहे. या जाहिर फलकावर २९ जुलै अशी तारीख ही दिसत आहे. या आशयाचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.