वरळी - इ मोझेस रोडवर असलेल्या हिंदू स्मशान भूमीचे रुप येत्या काही दिवसात पालटलेले पाहायला मिळणार आहे. वरळीचे स्थानिक आमदार सुनील शिंदे आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवारी या ठिकाणी विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
वरळी स्मशानभूमीत आता संरक्षण भिंत, गार्डन, टॉयलेट, वॉटर टँक, चेअर आदी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनेक दिवसांपासून दुरवस्थेत असलेल्या या स्मशानभूमीत नागरिकांना सोई सुविधा मिळाव्यात यासाठी वरळी विधानसभेचे युवा सेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील सुशोभिकरण करण्याची मागणी करत होते.
या वेळी नगरसेविका किशोरी पेडणेकर, उपविभाग संघटक अनुपमा परब, नगरसेवक अरविंद भोसले, उपविभाग प्रमुख राम साळगावकर, विधानसभा संघटक निरंजन नलावडे, समाजसेवक बाळशेठ खोपडे , शाखाप्रमुख जीवबा केसरकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.