Advertisement

ही बघा! चुनाभट्टीतील मोडकळीस आलेल्या इमारतीतल्या रहिवाशांची जगण्यासाठीची कसरत

अनेक रहिवाशी या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ही बघा! चुनाभट्टीतील मोडकळीस आलेल्या इमारतीतल्या रहिवाशांची जगण्यासाठीची कसरत
SHARES

मागील अनेक महिन्यांपासून मुंबईत धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, तरीही अनेक रहिवाशी या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतल्या चुनाभट्टीमधील टाटानगर इमारत दुरावस्थेत असून या इमारतीमधील १२२ कुटुंबं भितीच्या छायेत जगत आहेत. कधीही इमारत कोसळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, ही इमारत सुमारे ७० वर्षे जूनी आणि जीर्ण तसंच धोकादायक ठरली आहे.

गॅलरीचे कठडे तुटलेले

या इमारतीत सगळ्याच बाजूंचे गॅलरीचे कठडे तुटले आहेत. रहिवाशांना घराबाहेर पडताना मोठा कसरत करावी लागले आहे. तुटलेल्या कठड्यावरून धोरीच्या सहाय्यान जावं लागतं आहे. या इमारतीची रचना इंग्रजी 'सी'प्रमाणे आहे. ७० वर्षांच्या कालावधीत इमारत पूर्णपणे धोकादायक झाली आहे.


मृत्यूचा सामना

मागील दीड वर्षापासून इमारतीतील घरांच्या बाहेरील कठडे तुटले आहेत. या कठड्यांवरून ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. या इमारतीमध्ये ज्येष्ठ नागरिकही राहत असल्यानं त्यांची गैर सोय होत आहे. तसंच, कधीही मृत्यूचा सामना करावा लागू शकतो अशी भिती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. टाटानगर ही तीन मजली इमारत गिरणी कामगारांसाठी बांधण्यात आली होती. मात्र, आता या इमारतीची अवस्था भीतीदायक झाली आहे. या इमारतीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं त्या निकालाकडं रहिवाशांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement



हेही वाचा -

एनएमसी विधेयकाविरोधात देशभरातील डॉक्टर करणार उपोषण

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला १ ऑगस्टपासून सुरुवात


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा