मुंबईसह ठाणे आणि राज्यातील रिक्षावाल्याचा मध्यरात्रीपासून सुरू होणारा संप टळला आहे. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दालनात मंगळवारी बैठक बोलावली आहे. त्यामुळं न्याय मिळेल, या अपेक्षेनं आम्ही नियोजित संप मागे घेत आहोत, अशी घोषणा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे.
विविध मागण्यांसाठी राज्यातील रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला होता. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करण्याच्या मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटनांनी संपाची हाक दिली होती. मात्र, हा संप आता रिक्षाचालकांनी मागे घेतला आहे.
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज्यातील जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलवल्यानं हा संप मागे घेण्यात आला असल्याचं राव यांनी म्हटलं. त्यामुळं रिक्षाचालकांच्या मागण्यांवर बैठकीत तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान