Advertisement

सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या घटवण्यात आली आहे.

सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट
SHARES

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या घटवण्यात आली आहे. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत कुणीही मंदिर परिसरात गर्दी करु नये, असे आदेश देण्यात आले आहे.

सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आजपासून पुढील आदेशापर्यंत सिद्धिविनायक मंदिर काही ठराविक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. यासाठी भाविकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन बुकिंगद्वारे केवळ दर तासाला 50 भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत कुणीही मंदिर परिसरात गर्दी करु नये, असे आदेश मंदिरी समितीने दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा