वडाळा - बीपीटी वसाहतीत मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यामुळे परिसरातल्या रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. रहिवाशांच्या घरात साप, धामण, जळू शिरकाव करतात. शिवाय झुडपांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे परिसरात मलेरिया, टायफॉईड, अतिसार, कॉलरा असे आजार पसरले आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.
यासंदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. "येत्या दोन दिवसात इथल्या अनावश्यक झुडपांची टप्प्या टप्प्याने छाटणी करण्यात येईल," असे वडाळा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्वछता विभागाने सांगितले आहे.