मुंबई - शनिवारी जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येतोय. यानिमित्तानं मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागानं स्वच्छ शौचालय स्पर्धा आयोजित केलीय. त्यानुसार विभागातील पालिकेच्या 44 शौचालयांचं परीक्षण करण्यात येईल. 19 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर असं महिनाभर हे परीक्षण चालेल. स्वच्छ शौचालयास प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात येईल तर अस्वच्छ शौचालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफ दक्षिणचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.