Advertisement

किसान संघर्ष समितीचं १० जूनला 'चक्का जाम' आंदोलन


किसान संघर्ष समितीचं १० जूनला 'चक्का जाम' आंदोलन
SHARES

येत्या ५ जूनला शेतकरी अाणि शेतकऱ्यांची मूलं राज्यभर रस्त्यावर उतरणार असून भाजप सरकारनं तरीही एेकलं नाही तर १० जून रोजी पूर्ण राज्यात चक्का जाम अांदोलन करण्याचा इशारा किसान संघर्ष समितीनं दिला अाहे. मुंबईत अाज झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय किसान सभा अाणि अन्य सहा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील अांदोलनाची रूपरेषा सादर केली.


सरकारनं अाश्वासनं पाळली नाही

१ जूनपासून सुरु झालेल्या ऐतिहासिक संपाला काल एक वर्ष पूर्ण झालं. सरकारनं सरसकट कर्जमाफी करणार असल्याचं अाश्वासन दिलं होतं. पण भाजप सरकारनं या अाश्वासनाला हरताळ फासली अाहे. लाखो शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित असून सरकार मागे हटलं अाहे, अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डाॅ. अजित नवले यांनी केली.


काल महाराष्ट्रात २५ जिल्ह्यात घेराव घातण्यात अाले. देवेंद्र फडणवीस सरकार शेतकरीविरोधी अाणि कॉर्पोरेट धार्जिणं आहे. सध्या जो संप सुरू आहे, तो आमचा नसला तरी दुसऱ्या संपाला आमचा विरोध नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.
- डॉ. अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव


जानकर मुख्यमंत्र्यांच्या हातातील बाहुलं

महादेव जानकर हे मुख्यमंत्र्यांच्या हातातील कळसूत्री बाहुला अाहे. पुढचे १० दिवस अाम्ही अांदोलन करणार असून ५ तारखेला महाराष्ट्रातील शेतकरी अाणि त्यांची मूलं हे राज्यभरात जाणारा शेतीमाल अाणि दूध रोखणार अाहोत. त्यानंतरही सरकारनं अामचं एेकलं नाही, तर १० जूनला अाम्ही रस्त्यावर उतरून चक्का जाम करू, असंही नवले यांनी सांगितलं.


हेही वाचा -

शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, मिळालं लिखित आश्वासन

पायाच्या जखमेपेक्षा मनाची जखम मोठी, शेतकरी आजीची व्यथा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा